पारशिवनी तालुक्यातील मौजा चारगाव येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन व मनरेगा अंतर्गत वृक्षारोपण. — तहसीलदार व गटविकास अधिकारी याच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी :आज दिनांक 12/07/2023 ला गट ग्राम पंचायत चारगाव या गावात (ता.पारशिवनी ) येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन व मनरेगा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . 15000 हजार वृक्षांची रोपाची संकल्प घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली.

        या कार्यक्रमाला उपस्थित पारशिवनी तालुक्यातील तहसिलदार हनुमंत जगताप साहेब, पंचायत समिती पारशिवनी चे खंड विकास अधिकारी श्री. सुभाष जाधव साहेब( बिडीओ) . श्री रोशन शेडे तालुका कृ्षी अधिकारी ,श्री.ईशान राऊत (ACF -BC) श्री. रोशन मून (सचिव ग्राम पंचायत चारगाव ) चारगाव ग्राम पचायत चे माजी सरपंच श्री भगवान गदरे साहेब (माझी सरपंच )चारगाव

श्री. शेखर राऊत (सामाजिक कार्यकर्ता ) व ग्रामपंचायतचे सरपच उपसरपच ग्राम पंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक शिक्षक व इतरही गावातील शेतकरी कार्यक्रमाले उपस्थित होते.

 तहसीलदार श्री हनुमत जगताप साहेबांनी झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरणाचे रक्षण तरच तुमच्या जीवनाचे रक्षण होईल याबाबत माहिती दिली.

        तहसीलदार,BDO,आणि गावातील सहभागाच्या आणि सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन झाडे लावण्यात आले.अंबुजा सिमेंट फॉउंडेशन प्रक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ चांदेकर, दिनेश ताडे, क्रिष्णा केळवदे, रंजित कोटांगळे, आशिष सोमकुवर, प्रीती हातेकर, पवन कुंभारे,उमेश नगराळे, Cicr अधिकारी सन्नी शेंडे वृक्षारोपनाचे कार्यक्रमला प्रामुख्याने उपस्थित होते.