घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत ची अंमलबजावणी तात्काळ करा… — आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश… — कुरखेडा तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना मिळणार लाभ…

राकेश चव्हाण 

कुरखेडा प्रतिनिधी 

             मागील अनेक महिन्यापासून जिल्ह्यात शासकीय स्तरावरून मंजूर घरकुलाचे बांधकाम रेती अभावी रखडल्याने घरकुल बांधकाम थांबले गेले होते. एवढेच नव्हे तर चोरीच्या मार्गाने रेतीचा दर गगनाला मिळाला होता. त्यामुळे शेकडो घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असताना सुद्धा रेती मिळत नसल्याने तालुक्यातील बरेच घरकुलांची कामे ही थांबल्या गेली होती. 

           रेती उपलब्ध करून द्यावी याकरिता आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे अनेक घरकुल लाभार्थ्यांनी पाच ब्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे असे निवेदन सादर केले होते.

            त्या अनुषंगाने आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून जिल्हातील घरकुल लाभार्थ्यांना त्वरित पाच-ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी. या संदर्भात सतत पाठपुरावा केल्याने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेतीचा मार्ग आता मोकळा झाला.

           कुरखेडा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेतीचा लाभ तात्काळ मिळावा याकरिता आज कुरखेडा तहसील कार्यालयाचे तहसीलदार कुंभरे यांचे सोबत बैठक बोलावून लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्यात यावी याकरिता त्यांना निर्देश देण्यात आले.

            यावेळी कुरखेडा गट विकास अधिकारी धीरज पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोनेष मेश्राम, प्रा. विनोद नागपूरकर उपस्थित होते.