दुचाकीचा टायर फुटल्याने एकाचा मृत्यू …

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

साकोली – शिवनीबांध जवळ असलेल्या वळणावर येथील आशीष सहदेव बोंद्रे यांच्या दुचाकीचा समोरचा टायर अचानक फुटल्याने जागीच मृत्यू झाला.

         सविस्तर वृत्त असे की, आशीष सहादेव बोंद्रे वय 27 वर्ष राहणार दिघोरी आमगाव हा व्यक्ती तेरवी करिता सावरटोला या ठिकाणी गेला होता.

       परत येत असताना आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच 36 v 2008 वाहन वेगाने असताना अचानक समोरचा टायर फुटल्याने संतुलन बिघडले व तो जागीच ठार झाला.

          ही घटना दुपारी 2:15 वाजता घडली. त्याच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे.

        पुढील तपास पोलीस हवालदार अमित वडेट्टीवार करत आहेत.