उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
दि.10 मे ला पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती जि.चंद्रपूर ची हाॅटेल सनी पाॅइंट भद्रावती येथे बैठक आयोजित करण्यात आली.
त्यात सर्वानूमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात भद्रावतीच्या अध्यक्षपदी डाॅ.ज्ञानेश हटवार सर यांची तर उपाध्यक्ष पदी मनोज मोडक, सचिव प्रवीण चिमूरकर, कोषाध्यक्ष-शिरीष उगे,संपर्क प्रमुख-हर्षल रामटेके, प्रसिद्धीप्रमुख – आशिष कोटकर आणि सदस्य उमेश कांबळे यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष डाॅ.ज्ञानेश हटवार सर यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती च्या वतिने नवीन शैक्षणिक वर्षांत जि.प.शाळेतील मुलांना शालेय साहित्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले.
पुरोगामी पत्रकार संघाचा विस्तार व पुरोगामी पत्रकार संघ सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणुन ओळख निर्माण करेल असा निश्चय नवनियुक्त अध्यक्ष डाॅ.ज्ञानेश हटवार सर यांनी व्यक्त केला आहे.