युवारंग निशुल्क समर कॅम्पमधील चिमुकल्यांच्या वतीने श्री.छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी… — अथांग बुद्धीचातुर्यचे धनी, शीस्त व शास्त्र पारंगत श्री. छत्रपती संभाजी महाराजांचे आदर्श घ्यावे :- विलास गोंदोळे

प्रितम जनबंधु

    संपादक 

        आरमोरी :- नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या युवारंग संघटना, आरमोरी तर्फे दि.१२ मे २०२४ पासुन सुरू असलेल्या निशुल्क समर कॅम्प मध्ये आज दिनांक.१४ मे २०२४ ला सकाळी ७:०० स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या भव्य पटांगणावर स्वराज्य रक्षक श्री.छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

         या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सामाजिक विचारवंत मा. विलासजी गोंदोळे साहेब तर उद्घाटन म्हणुन डॉ. आशिषजी दोनाडकर साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा रक्तदाता समिती चे अध्यक्ष चारुदत्त राऊत सर, जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप चे सहप्रशिक्षक मा. राजुजी अतकरे सर युवारंग निशुल्क शिकवणी वर्गाचे संयोजक मा. उमेशजी पिंपळकर सर, समर कॅम्प चे संयोजक मा. रोहित बावनकर सर, प्रिन्स सोमनकर सर युवारंग चे सदस्य पंकज इंदूरकर, अंकित बन्सोड, सुमित खेडकर, सूरज ठाकरे उपस्थित होते.

       याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासजी गोंदोळे यांनी विद्यार्थ्यांना स्वराज्य रक्षक श्री. छत्रपती संभाजी महाराजांचा महापराक्रम, इतिहास, सर्वाना थक्क करून टाकणारी त्यांची युद्धनीती व संस्कृत, इंग्रजी, उर्दू , फारशी सह अनेक भाषेवरचे त्यांचे असलेले प्रभुत्व तसेच शत्रुची बुद्धी चक्रावून टाकणारा त्यांचा गनिमी कावा, त्याची अकल्पित बुद्धीचातुर्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

                 याप्रसंगी समर कॅम्पचे शेकडो विद्यार्थी पालक व युवारंगचे सदस्य उपस्थित होते.