तुला बर्थडे गिफ्ट देतो म्हणुन विषयतज्ञाने आश्लील कृत्य विनयभंग केल्याची घटना उघडकीस…

 

   अमान कुरैशी 

जिल्हा प्रतिनिधि सिंदेवाही

 

सिंदेवाही येथे एका बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात भारत मेश्राम विषयतज्ञ गट साधन केंद्र सिंदेवाही यांनी

 एका विद्यार्थिनीला एक ट्राफी व प्रमाणपत्र दिले होते त्यामुळे त्यां शिक्षकाची विद्यार्थींनी सोबत ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत विषयतज्ञाने विद्यार्थींनीच्या घरी येणे जाणे सुरू केले. त्यामुळे विद्यार्थींनीचे आईवडीलां सोबत जवळीकता केली. काही दिवसांपूर्वी सिंदेवाही शहरात त्या विद्यार्थींनीला शिक्षण पुर्ण करण्यासाठी सुविधा म्हणून किरायाची रुम त्या विषयतज्ञाने करून दिली. 

काल दि. 12/07/2023 रोजी विद्यार्थीनीचा भाऊ शाळेत गेला असल्याचा फायदा घेत विषयतज्ञाने एका शाळेच्या महत्त्वाचे कामाने चर्चा करायची आहे म्हणून फोन करून घरी येतो म्हणून म्हणाला व काही वेळाने तो विषयतज्ञ घरी गेला तेव्हा विद्यार्थीनी घरात एकटी होती. विषयतज्ञ घरी आल्याने माना सन्मानाने संभाषण सुरू होतं त्या दरम्यान त्यांना पाण्याचं ग्लास दिल पाणी पिले व ग्लास खाली ठेवत विद्यार्थींनीला म्हणु लागले की, तुझा बर्थडे आहे. मी तुला गिफ्ट म्हणून ड्रेस घेवुन देतो. असे म्हणाले व खाटेवर बसुन विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे करुण विनायभंग केल्याने भारत मेश्राम या विषयतज्ञाला धक्का देऊन दुर केला. हे सर्व घटना पिडीत मुलीने पोलिस स्टेशन सिंदेवाही ला तक्रारीमधे दाखल केली असून धारा 354,354A,451 भादवी गुन्हा दाखल केला आहे.