माहुली येथे सार्वजनिक विकास कार्यक्रम अंतर्गत पोषक आहार किट वाटप…

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

 पारशिवनी, तालुक्यातील माहोली येथे मॉल सार्वजनिक विकास कार्यक्रम अंतर्गत बायफ संस्थेतर्फे गर्भवती तसेच स्तनदा माता यांना पोषक आहार व न्यूट्रिशन किट वाटप करण्यात आले.

       कार्यक्रमाला बायफ संस्थेचे अधिकारी श्रीकृष्ण कुमार, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जयस्वाल, अर्चना घरत, आरोग्य सखी शेंडे, बायफ सीआरपी लंकेश्वर पाटील, अंगणवाडी सेविका नंदा डोंगरे, सीमा उरकुडे, उमेद बचत गट सीआरपी सीमा पाटील, आशा वर्कर प्रतिभा शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.