Home Maharashtra सौ.अन्नुताई विनोद खोब्रागडे यांचा हिंगणा येथे सन्मानपूर्वक सत्कार… — राजमाता राष्ट्रमाता...

सौ.अन्नुताई विनोद खोब्रागडे यांचा हिंगणा येथे सन्मानपूर्वक सत्कार… — राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,मुक्ताई साळवे,फतीमा शेख यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         नागपूर जिल्हातंर्गत तालुका स्थळ असलेल्या हींगणा येथे समता सैनिक दला तर्फे राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ-क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले-मुक्ताताई साळवे जयंती-फातीमा शेख, यांच्या जयंतीचा कार्यक्रम संयुक्तरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे प्रमुख आयु.केशवराव डोंगरे होते तर उद्घाटक म्हणून संविधान अभ्यासक विनोद खोब्रागडे व इतर मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.

          सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,मुक्ताताई साळवे,फतीमा शेख यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

        संयुक्त जयंतीच्या निमित्ताने,चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील रणरागिणी आयु.अन्नुताई विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्त्या यांचा शाल,सन्मानपत्र,तसेच सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती आयु अन्नुताई विनोद खोब्रागडे यांनी चालु घडामोडी वर आपले मनोगत व्यक्त केले.

        कार्यक्रमाला सात खंजेरी वादक प्रबोधनकार संविधान शेंडे सह निशाताई धोंगडे चंद्रपूर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

          कार्यक्रमाचे उद्घाटन आयु.विनोद खोब्रागडे कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी केले.

              सर्व समाजातील महापुरुषांना,जाती जातीत वाटुन न घेता त्यांचे विचार आत्मसात करावे,याच उद्देशाने समता सैनिक दलाने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समता सैनिक दलाचे विनोद खोब्रागडे यांनी उद्घाटनप्रसंगी मनापासून अभिनंदन केले. 

        कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन गायधने मॅडम व इतर मान्यवर मंडळींनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

          राष्ट्रगीतव बुद्ध वंदना नंतर समता सैनिक दलाचे संकल्प वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक,बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

          सदर संयुक्तरित्या जयंतीचा कार्यक्रम १२ जानेवारी २०२६ ला पार पडला.