ताराचंदजी निखाडे अद्यापक विद्यालय साकोली येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तिक जयंती निमीत्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा… — राज्यस्तरीय कौशल्य विकास अभियाना विषयी मार्गदर्शन…

   चेतक हत्तिमारे

जिल्हा प्रतिनिधि भंडारा

साकोली:-आज दिनांक १२ जानेवारी २०२४ ला ताराचंदजी निखाडे अद्यापक विद्यालय साकोली येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तिक जयंती निमीत्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा व राज्यस्तरीय कौशल्य विकास अभियान या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

        सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य के. पी. राऊत सर ता. नि. अ. विद्यालय साकोली,कौशल्य विकास मार्गदर्शक म्हणून नितीनजी शहारे आणि विश्वजित भोवते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. नीता टी. टेंभरे मॅडम उपस्थित होते.

         सदर कार्यक्रमामध्ये प्रा. टेंभरे मॅडम यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नितीनजी डोंगरे यांनी राज्यस्तरीय कौशल्य विकास अभियान या विषयी सखोल अशी माहिती दिली.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य के. पी. राऊत सर यांनी युवकांनो जागे व्हा व राष्ट्र निर्मितीसाठी आपले योगदान द्या असे स्वामी विवेकानंदाचे विचार व राजमाता जिजाऊ यांचे कर्तृत्व याविषयी मार्गदर्शन केले.

        या कार्यक्रमामध्ये डी.एल. एड्. च्या विध्यार्थ्यांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेऊन विध्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

             सदर कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. एल. एस. सुपारे मॅडम, प्रा. जी. जी. इंदुलकर सर, प्रा. ए. डब्ल्यू. खळोदे मॅडम, प्रा. डी. पी. घरडे सर, प्रा. आर. बी. मांदाडे सर, प्रा. आर. डी. कापगते सर, दिगंबर झोडे सर, राजानंद मेश्राम यांनी सहकार्य केले.