मन प्रसन्न ठेवण्यासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असते :-से.नि.मस्के — कलाबाई कन्या विद्यालयात क्रीडा सत्र संपन्न…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

          साकोली -मुलांना शालेय वयातच खेळाची आवड निर्माण करण्यात पालक आणि शिक्षकांची जबाबदारी महत्वाची आहे. मन प्रसन्न ठेवण्यासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असते. शिक्षणाबरोबर खेळाला महत्व दिले पाहिजे, भविष्यात येणाऱ्या आव्हांनाना सामोरे जाण्याचे सामर्थ्य खेळातून मिळते.

            आताच्या काळात मुले मोबाईल, इंटरनेटचा वापर अधिक करतात. कार्टून्स, गेम, मोबाईलवर बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल खेळत बसतात. मुलं मैदानावर आली पाहिजेत. मला जमत नाही ही भूमिका सोडा, जमलं पाहिजे ही भावना ठेवा. लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. बालवयापासुनच विविध खेळात समरस झाले पाहिजे. असे मत कलाबाई कन्या विद्यालयाचे सेवा निवृत्त शिक्षक मस्के यांनी व्यक्त केले.

          १३ जानेवारी रोजी कलाबाई कन्या विद्यालय व आनंदाबाई कन्या प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत वार्षिक क्रीडा सत्र संपन्न झाला.यात शाळेतील विध्यार्थी व विशेष करून मुलींचा सहभाग पहावयास मिळाला.

          पार पडलेल्या या वार्षिक क्रीडा सत्रात सगळ्याचा सहभाग पाहण्या सारखा होता.विद्यार्थ्यांमध्ये काही वेगळाच जोश होता, जे सहभागी नव्हते तेही आपल्या आवडत्या खेळाडूचे मनोबल वाढवत असताना पाहायला मिळाले.

             या क्रीडा सत्रात विविध स्पर्धा क्रीडा शिक्षक चेतक हत्तीमारे व प्रा.कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

               विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि. शिक्षक मस्के हे होते तर कलाबाई कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.बी. चोले ,आनंदाबाई कन्या विद्यालय चे मुख्याध्यापक डी.एम.राऊत ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाविका येवले,आय.बी.कापगते,शेख ,सौ.बडोले,तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष ऋग्वेद येवले प्रमुख पाहुणे म्हणून होते.

           तसेच मंचावर सौ.एम.डी.नगरकर ,सौ एस.एस. झिंगरे ,सौ एस.डी.भुरे सौ.ए.वी. माटुरकर,सौ. राऊत ,शेख व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर स्नेहभोज देण्यात आले.