आरमोरी नागपूर महार्गावरील लावलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केलेल्या समाजकंठकावर तातडीन कार्यवाही करावी…. — अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल….. — तक्रारअर्ज सादर करत विवीध संघटनेचा ईशारा…

प्रितम जनबंधु

    संपादक 

 आरमोरी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आरमोरी नगरपरिषद अंतर्गत आरमोरी नागपूर महामार्गावर ( अरसोडा फाटा ) सर्व महापुरुषांच्या प्रतिमा लावून सुशोभीत करण्यात आले होते आणि हा खुप स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता. या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेची योग्य प्रकारे देखरेख करण्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेची असल्यानंतरही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलल्या दुर्लक्षीत पणामुळे काही समाजकंटकांनी तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतीमेची तोडफोड करुन त्यांचे तुकडे करुन रस्त्याच्या कडेला कचऱ्यात फेकले असल्याचे दिसून येत आहेत. सदर काम जाणीवपूर्वक करण्यात आले असुन महापुरुषाची विटंबना केली गेली असल्याचे दिसुन येत आहे.

           सदर प्रकरणामुळे सर्व आरमोरी वासियांच्या व सर्व सामाजिक संघटनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याकरिता ज्या कुणी बेजबाबदार व्यक्तींनी सबब प्रतीमेची विटंबना केली आहे त्यांचा योग्य प्रकारे लवकरात लवकर शोध घेऊन त्या समाजकंटकावर योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनेमार्फत तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

    

         तद्वतच नगरपरीषदेच्या कर्मचाऱ्यांची नैतीक जबाबदारी असतांना सुद्धा त्यांनी निष्काळजीपणा केला त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अन्यथा विवीध समाजसंघटनेच्या मार्फतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

               प्रामुख्याने तक्रार दाखल करणारे तक्रारकर्ते यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवांमच आरमोरी, सम्राट अशोक सोशल फोरम आरमोरी, आदिवासी ऐम्प्लॉईज फेडरेशन आरमोरी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आरमोरी, तालुका माळी समाज संघटना आरमोरी, युवारंग संघटना आरमोरी आदी संघटना एकवटल्या असुन पोलिस स्टेशन आरमोरी, तहसिल कार्यालय आरमोरी, नगर परिषद आरमोरी, तालुका पत्रकार संघ यांना सामुहिक तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

        तक्रारअर्ज सादर करतेवेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच आरमोरीचे कार्यकर्ते जगदीश दामले, तुषार रामटेके, राकेश मेश्राम, संप्रती मेश्राम, रुपेश पुणेकर, अमित हुमणे, अनुप रामटेके, साहिल बांबोलकर, मोहनिश मेश्राम, प्रतीक रामटेके, मंगेश पाटिल व इतर प्रियदर्शी सम्राट अशोक सोसियल फोरम, आरमोरीचे कार्यकर्ते डॉ. प्रदीप खोब्रागडे सर,तालुका माळी समाज संघटना आरमोरीचे प्रमुख कार्यकर्ते रणजित बनकर सर, रामहरी वाटगुरे सर,आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आरमोरीचे कार्यवाहक डॉ. नीलकंठ मसराम सर, डॉ. मुखरु चिखराम सर, प्राचार्य प्रकाश पंधरे सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा आरमोरीचे कार्यकर्ते चेतन भोयर, आशिष मने, श्याम तीतीरमारे तथा इतर संघटनेतील कार्यकर्ते पंकज जांभुळे व सारंग टेंभुर्णे आदी सामाजीक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.