ओबीसी उपोषणकर्ते अक्षय लांजेवार यांची प्रकृती खालावली.. — डॉ.नामदेव किरसान आणि डॉ.सतिश वारजूकर यांनी पदाधिकाऱ्यांसह चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घेतली भेट..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

         चिमूर येथे ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या संदर्भात ७ डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ तालुका अध्यक्ष चिमूर अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली होती.

            आज अन्नत्याग उपोषणाचा आज सहावा दिवस सुरू आहे.६ व्या दिवशी अचानक उपोषण कर्ता अक्षय लांजेवार यांची प्रकुर्ती खालावली व त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.

           याची माहिती मिळताच राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजूकर व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेवराव किरसान यांनी चिमूर येथे जाऊन अक्षय लांजेवार यांची भेट घेतली व आरोग्यासंदर्भात त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली आणि उपचार बरोबर होत आहेत काय?या बाबतीत माहिती जाणून घेतली..

        या वेळी,चंद्रपूर जिल्हा कांग्रेस सरचिटणीस गजाजन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे,तालुका सचिव विजयजी डाबरे,युवक कांग्रेस अध्यक्ष नागेद्र चट्टे,तालुका उपाध्यक्ष विनोद ढाकूनकर,राजू चौधरी,स्वप्नील मालके,पप्पू शेख,बालू सातपुते,कवडूजी लोहखरे,शांताराम सेलवटकर,रामदास कामळी,राजू दांडेकर,सुधीर जुमडे,जाबीर कुरेशी उपस्थित होते.