आश्वासनांची पूर्तता न केल्याने उलगुलान कामगार संघटनेने वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपणीविरोधात मेजर गेटसमोर सुरू केले साखळी उपोषण… — कामगार पी एफ चोरांनवर गुन्हा दाखल होणार काय ?

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

           आश्वासनांची पूर्तता न केल्याने उलगुलान कामगार संघटनेने वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपणीविरोधात मेजर गेटसमोर आज मंगळवार पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. मागील कित्येक वर्षांपासून कुणाल कंपनीत कंत्राटी कामगार काम करत आहेत.

         मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही, कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते. या सर्व बाबी कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना वारंवार निदर्शनास आणून दिल्या. मात्र कंपनीवर अजूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

        या सर्व प्रकारामुळे कामगारांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होत असून कामगारांचे वेतन वेळेत देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावा, कामगारांना वेतन वाढ देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन 5 सप्टेंबर पासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाचा धसका घेत वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेची बैठक घेतली.

         या बैठकीत कामगारांच्या मागण्या मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन सुद्धा देण्यात आले. मात्र अजूनही मागण्यांची पूर्तता न केल्याने आज मंगळवार पासून मेजर गेट समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

          यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, रवि पवार, पवन भगत, नंदलाल वर्मा, गुरु भगत, कुणाल चौधरी, सुमित भिमटे, मगेश बदकल, अक्षय राउत, अभय सपाट, अमर गोलटकर, शाम चुके, मोनू मटाले, प्रतीक मानकर, प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मंडावी, सुधीर डाहाकी, आंनद पुणेकर, राजु जगने, प्रदीप झामरे, प्रफुल्ल पाटिल, राहुल वाभले आदि उलगुलान कामगार उपस्थित होते.