जप तलाई ते चुडियाल रस्ता बंद… — विद्यार्थी व नागरिक अडकलेत… 

 

भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

धानोरा: –

        सायंकाळी चार ते पाच वाजता आलेल्या मुसळधार पावसामध्ये धानोरा तालुक्यातील जपतलाई ते चुडियाल या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने जपतलाई ते चुडीयाल हा रस्ता बंद झाला आहे.

         सदर नदीला पूर आला त्याच वेळेस विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ होती.चुडियालचे जिल्हा परिषद शाळा जपतलाई येथे शिकणारे विद्यार्थी तसेच धानोरा येथे येणारे विद्यार्थी तसेच नागरिक काही कामानिमित्ताने धानोरा आलेले हे सर्व नागरिक जपतलाई येथे अडकून पडले आहेत.

          विद्यार्थ्यांना व नागरिकांना चुडियाल या गावी जाण्यासाठी हा एकच रस्ता असल्यामुळे त्यांना दुसरे कोणतेही रस्ता नाही.त्यामुळे तेथेच सर्व विद्यार्थी व नागरिक अडकून पडले असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे.

        चुडियाल गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व तेथील ग्रामसेवक यांना चुडीयाल नागरिकांच्या मदतीने त्या नदीतून बाहेर काढण्यात आले.

        यानंतर त्या नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर गावाकडे येणारे विद्यार्थी व नागरिक अळकुन पडलेले असल्याचे गावातील नागरिकांनी संपर्कातंर्गत सांगितले.

       पूर परिस्थिती मुळे विद्यार्थी व नागरिक अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.