युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्याबद्दल अंजनगाव सुर्जी येथील कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी केलेल्या अपमान जनक वक्तव्याचा दर्यापूर काँग्रेस कडून मंगळवारी (१२) निषेध करण्यात आला.
यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत दर्यापूर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात नारेबाजी केली.
स्थानिक दर्यापूर बस स्थानक चौकात दुपारी एक वाजताच्या दरम्यान दर्यापूर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आमदार रवी राणा यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्या विरोधात केलेल्या अपमान जनक वक्तव्याचा जोरदार निषेध केला.
यावेळी आमदार रवी राणा यांच्या पुतळा जाळण्याच्या प्रयत्नात दर्यापूर पोलिसांसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची लोबाझोबी झाली.
अखेर पोलिसांनी कापडी पुतळा जप्त करून दर्यापूर पोलिस स्टेशन येथे जमा केला.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या बॅनर वरील फोटोला जोड्यांनी मारले व फोटो पेटवला.
दर्यापूर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्यापूर बस स्थानक चौकात तासभर निदर्शने करत रास्ता रोको केला.
दर्यापूर पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव नितेश वानखडे,सागर देशमुख,पोलेन ढोके,दिलीप चव्हाण,जगदीश कांबे,भारत आठवले,बुद्धभूषण गवई,सचिन धुर्वे,दादाराव इंगळे,तेजस नितणवरे,निशिकांत पाखरे,मनोज प्रज्ञावंत उमक,संतोष आठवले,राज इंगळे,राजकुमार खडे,प्रकाश चव्हाण,सुनिल डोंगरदिवे,रोहित काळे,आदिल घाणीवाले,संदीप जामनिक यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.