पारशिवनी पोलीस ठाण्यात शांतता समिती समितीची सभा सपन्न…. — आगामी सण पोळा,गणेश उत्सव,ईद व गणेश विर्सजन उत्सव शांततेत साजरे करण्याचा संकल्प.

 

कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :-पारशिवनी शहरासह ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील गावामध्ये आगामी पोळा,गणेश उत्सव,महालक्ष्मी पुजन,ईद ए मिलाद व ईतर उत्सव शांततामय व आनंददायी वातावरणात पार पाडण्यासाठी पारशिवनी पोलिस स्टेशन येथे शांतता कमिटी सदस्याची व सर्वधर्मीय जेष्ठ नागरिकांची सभा ठाणेदार राहूल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. 

          पारशिवनी पोलीस स्टेशन आवारात आज मंगलवार दिनांक १२ सप्टेंबरला आगामी सण उत्सव संदर्भात ठाणेदार राहूल सोनवणे यांनी शांतता समिती सदस्य,पोलीस पाटील व सर्वधर्मीय जेष्ठ नागरिकांची सभा घेतल्या गेली.

         सदर सभेमध्ये नायब तहसीलदार,पोलीस उपनिरीक्षक आकरे,उपनिरीक्षक नागुलवार,डॉ.इरफान अहमद शेख,अफरोज खान,बाबा पठाण. गोपाल कडू,विजय भुते,भाउराव कुरळकर आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        गणेश उत्सव साजरा करणारे मंडळाचे सदस्यांनी उत्साहात काय खबरदारी घ्यावी या बाबद पोलीस निरीक्षक राहूल सोनवणे यांनी विशेष मार्गदर्शन केले व ठरवून दिलेल्या आणि शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे,तसेच पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आव्हान केले. 

         सण उत्सव मध्ये ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही.सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या तलावात करण्यात यावे.. 

          तसेच अंनत चतुर्थीस. ईद.ए.मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण एकाच दिवशी असल्याने सामाजिक एकात्मता,सामाजिक सलोखा,भाईचारा कायम राहील असे आव्हान करण्यात आले.

           याप्रसंगी पोलीस पाटील संघठनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिमा कळमकर,पोलिस पाटील संगघटनचे तालुका अध्यक्ष ताराचंद कामडे,गोपाल कडू यांनी सभेला विशेष मार्गदर्शन केले.

         पोलिस स्टेशनला १४ नवनियुक्त पोलिस पाटिल यांचा सत्कार करण्यात आला व अतिथी यांनी मार्गदर्शन केले.डॉ.इरफान अहमद शेख यांनी नागरिकांना एकात्मतेचा संदेश देण्याचे आव्हान केले. 

         कार्यक्रमाचे संचालन गोपनिय विभागाचे पो.हवा. पृथ्वीराज चौहान यानी केले व आभार प्रदर्शन ताराचंद कामडे पोलीस पाटील पालोरा यांनी केले.