बहुजनासाठी लढणारा वडेट्टीवार कधीच गुलामगीरी करण्याकरीता भाजपाच्या दारात जाणार नाही:-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य 

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        सर्व सामान्य बहुजनासाठी लढणारा वडेट्टीवार गुलामगीरी करण्याकरिता कधीच भाजपाच्या दारात जाणार नाही असे आज कुरखेडा तालुक्यात महाविकास आघाडी उमेदवार डाॅ.नामदेव किरसान यांचे प्रचाराकरीता आयोजित जाहिर सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले.

      बहुजनानाअत्यावश्यक निवाराची गरज असते परंतु आजघडीला घरकूल बांधकाम साहित्याचा कीमतीत दूपटीने वाढ झाली मात्र मागील ५ वर्षात राज्य शाशनाने अनूदानात कोणतीच वाढ केली नाही.

         केंद्रासह राज्यातही ६ महिण्यानंतर सत्तांतर होणार आहे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच घरकूल करीता ग्रामीण भागात ३ लाखाचे अनूदानाचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यानी यावेळी दिले.

       अवकाळी पाऊसामुळे गांधी चौकात होणारी सभा ऐन वेळी किसान मंगलकार्यात घेण्यात आली. सभेला थोडा उशीर झाला तरी वडेट्टीवार यांना ऐकण्यासाठी सभास्थळ कार्यकर्तांनी भरगच्च भरले होते.

        यावेळी महाविकास आघाडी चे उमेदवार डाॅ. नामदेव किरसान ,माजी आमदार आनंदराव गेडाम,शिवसेना (उ.बा.ठाकरे)चे जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,रिपब्लिकन पार्टी चे रोहिदास राऊत,काँग्रेस किसान सेलचे वामनराव सावसागडे,माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, अमोल मारकवार,आप चे नासिर हासमी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जिवन ना ट,प्रभाकर तुलावी,जयंत हरडे, न.प. अध्यक्ष अनिता बोरकर, गिरीधर तितराम,अविनाश ममगेडाम, नंदु चावला, विकास प्रधान, नगरसेविका आशा तुलावी, सह आघाडी पक्षाचे कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.महिलांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती.