बारामती लोकसभा मतदार संघात ननंद भावजयची अस्तित्वाची लढाई… — मतदार राजा कोणत्या बाजूने कौल देणार याकडे महाराष्ट्र सह देशाचे लक्ष लागणार?

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        येणाऱ्या लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे 2024 साठी बारामती लोकसभा मतदार संघात ननंद भावजयची लढत पाहण्यासाठी राज्यासहित संपूर्ण देशामध्ये लक्षवेधी ठरणार आहे. मतदाराचा कौल हा योग्य दिशेनेच जाणार. एकीकडे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे. गेले 15 वर्षापासून दिल्लीमध्ये संसदेत खासदार म्हणून काम करीत आहेत.

          केंद्रामध्ये संसदेत केलेली कामगिरी या माध्यमातून संपूर्ण बारामती मतदार संघात विकासाची गंगा आणली आहे.देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आसल्यामुळे यांच्या माध्यमातून केलेला विकास हा शेतकऱ्यांसाठी आनेक योजना, गोरगरिबांचे प्रश्न, भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. देशाचे कृषिमंत्री आसताना चौफेर विकास गंगा करून गरिबांना कामे शेत मालाला योग्य भाव, शिक्षण क्षेत्रातील विविध ठिकाणी प्रत्येक गावोगावी शालेय संस्था आसा सर्वांगीण विकास दिसत आहे अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, घरकुल योजना, संपूर्ण योजनेचे जाळे असून राज्याचा विकास केला,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट,तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, याच पक्षांमध्ये काका पुतण्यात हे दोन गट झाले पहावयास मिळत आहे. सर्व राज्यासहित देशाला माहित आहे.

          तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नावाजलेले अजित दादा पवार यांची संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन सत्तेमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन काही महिन्यापासून राज्याचा कारभार पाहण्यासाठी सुरुवात झाली.

         पक्षाच्या माध्यमातून आनेक योजना शाळा रस्ते गोरगरिबांचे प्रश्न कोट्यावधी रुपये यांची कामे मंजूर करून सर्व कामे मार्गे लावलेले आहेत. विकास हा संपूर्ण बारामती मतदारसंघात घडवून आणला अजित दादा हे बोलतात ते करूनच दाखवितात एखाद्या व्यक्तीला जर कोणताही शब्द दिलेला आसला तर ते खरंच करून त्या व्यक्तीचे कामच करून दाखवनिर आशी धाडसाने केलेल्या कामाची ही पूर्ण राज्यामध्ये व देशात ओळख आहे.

          महाराष्ट्र राज्यामध्ये कामाची पोचपावती ही तळागाळातील जनते पासून ते मोठ्यापर्यंत ओळख आसल्यामुळे एवढी मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टीने अजित दादा पवार यांना दिलेली आहे. म्हणूनच बारामती लोक सभेसाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी दिलेली आहे.

          देश पातळीवर पाहिल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधून शरद पवार गटातून खासदार सुप्रियाताई सुळे यांना उमेदवारी मिळालेली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या सहकार्याने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाच्या वतीने सुनेत्राताई पवार यांना बारामती लोक सभेसाठी उमेदवारी मिळालेली आहे दोन्ही ही बाजू समान दिशेने पाऊल चाललेले आहे.

           तळागाळातील जनतेने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दोघेही उमेदवार यांचा गाव भेट दौरा चालू आहे. खरी लढत पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशात लक्षवेधी ठरणार आहे. दोन राष्ट्रवादी पक्षातील गावा गावातील कार्यकर्त्यांना कोणाकडे जावे, मतदान कोणाला द्यावे, विकास कोणी केला, यापुढे कोणाला निवडून आणायचे हे मतदार राजाच करणार आहे.

          एकाच कुटुंबातील ननंद भावजयाचा सामना पाहण्यासाठी दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चर्चा तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने निवडून आणण्यासाठी लावलेली ताकद आसुन हे सर्व काही मत पेटीत जनताच ठरविणार आहे. देश पातळीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब एकीकडे, तर दुसऱ्या बाजूने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने ननंद व भावजय आशी बारामती लोकसभा मतदार संघात सामना रंगलेला आहे.

        मतदार राजा व गावचा कार्यकर्ता पक्षाकडे पाहून मतदान करणार नाही पाच वर्षात एकदाच मतदानाची वेळ येते हे लक्षवेधी ठेवून उद्याच्या लोकसभेसाठी ज्या नेत्यांनी गाव पातळीवर विकास किती केलाय हे न पाहता येथून पाठीमागे विकास काय झाला शेतीसाठी कोणत्या सुविधा आणल्या गोरगरिबांना शेतमजुरांसाठी काय विकास व गरजा भागिल्या तर शेतमजुरसाठी काय विकास केला व गरजा भागविल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का आशा अनेक प्रश्नांचा विचारपूर्वक करूनच मतदान राजा मतपेटीत आपले मतदान करणार.