आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याबद्दल अमरावतीत जल्लोष…

युवराज डोंगरे 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)

आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याबद्दल राजकमल चौक अमरावती येथे आम आदमी पार्टी अमरावती महानगर व ग्रामीण च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा प्रसंग जल्लोषात साजरा केला.

प्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त चित्रा चौक येथे त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्या गेले व नंतर राजकमल चौकामध्ये बत्ताशे वाटून व ढोल ताशे वाजवून, नारे देऊन, नाचून, मनोगत व्यक्त करून हा ऐतिहासिक प्रसंग साजरा करण्यात आला.

            याप्रसंगी श्री संजयजी कोल्हे, प्रवक्ता,विदर्भ, श्री राजीव तायडे,अध्यक्ष,अमरावती ग्रामीण, डॉ. पंकज कावरे ,श्री प्रवीण काकड, डॉ. भारती जाधव, श्री नागेश लोणारे, एड. प्रवीण बारंगे, सौ विद्याताई सांगळूदकर, श्री गोपाळ ढोणे ,संयोजक, दर्यापूर, प्रा.गजानन सावरकर, डॉ. नितीन सावरकर इत्यादी अनेकांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

        या प्रसंगी प्रा. गजानन सावरकर ,डॉ. नितीन सावरकर, श्री बलरामजी काळमेघ, श्री गजानन रावस्कर, श्री रुपेश मोरे, सर्व राहणार दर्यापूर इत्यादींनी पक्षात प्रवेश केला.

           याप्रसंगी वरील व्यक्तीं व्यतिरिक्त श्री अमर पेठे, श्री नितीन मोहिते, श्री प्रमोद कुचे ,सौ रेखा हजारे ,श्री गोपाल तराळे, श्री कैलास जयसिंगपुरे ,नईम शेख, श्री ऋषिकेश झासकर,श्री अमोल तायडे, श्री विपुल चांदे ,श्रीबाळासाहेब भोंडे, श्री पवन मालवीय, श्री प्रज्वल आंडे शेख हमीद ,मोहम्मद जानी, अब्दुल जब्बार ,इनायत खान ,श्री संदीप हजारे, अफसर शहा ,सय्यद मुशरफ इत्यादी अमरावती महानगर, अमरावती ग्रामीण, दर्यापूर, मोर्शी चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.