अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण होले यांची नियुक्ती.

युवराज डोंगरे 

खल्लार/प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठा महासंघाची नागपूर येथे विदर्भ स्तरीय आढावा बैठकीचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात आले होते .या बैठकीमध्ये विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यादरम्यान या बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ही कार्यकारणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे , राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये भैय्यासाहेब निचळ यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर किरण होले यांची कार्याध्यक्ष अमरावती ग्रामीण पदी निवड करण्यात आली मनोज देशमुख यांची पश्चिम ग्रामीण अध्यक्ष, भानुदास बोदळे पाटील महानगर अध्यक्ष अमरावती म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. तर राजेश देशमुख यांची कार्याध्यक्ष अमरावती महानगर पदी निवड करण्यात आली महिलांमध्ये श्रीमती प्रतिभाताई टेटू यांची महिला अध्यक्ष महानगर अमरावती या पदावर निवड करण्यात आली ,तर सौ छायाताई पाथरे यांची अमरावती पश्चिम ग्रामीण महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुरेश सरळ यांची चांदुर रेल्वे ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर गणेशराव रेखे यांची दर्यापूर ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व युवक अमरावती पश्चिम अध्यक्षपदी विहार लकडे तर अमरावती महानगर युवक अध्यक्षपदी प्रतीक रमेशराव गोडखेडे यांची निवड करण्यात आली या सर्व नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस मराठा महासंघाच्या प्रमुख नेत्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.