अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुडबॉल स्पर्धेत महात्मा गांधी कॉलेज पारशिवनीची इशिका सहारेला सुवर्णपदक व ज्ञानेश्वर सावरकरला रजत पदक…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:-स्थानिक महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जयपुर (राजस्थान) येथील सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ येथे दिनांक ०२ एप्रिल ते ०६ एप्रिल २०२३ पर्यंत झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ज्ञानेश्वर सावरकर, नरेद्र चटप, कुणाल ढोबळे, इशिका सहारे, कु. खुशाली लाड, अश्लेशा सहारे व साक्षी मुरतकर यानी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फुडबॉल संघाचे प्रतिनिधीतत्व केले.

तसेच महाविद्यालयातील इशिका सहारे व ज्ञानेश्वर सावरकर यानी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुडबॉल स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत सुवर्ण पदक व रजत पदक प्राप्त केले त्यांच्या यशाबददल व्हीएसपीएम अकेडमी ऑफ हायर एज्युकेशनचे अध्यक्ष माजी मत्री रणजीतबाबू देशमुख, भाऊसाहेब भोगे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिषबाबु देशमुख तसेच व्हीएसपीएम अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशनचे कार्यवाह श्री. युवराजजी चालखोर साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर खडसे स्थानिक व्यवस्थापण समितीचे सदस्य , पुरुषोत्तम धोटे, गंगाधर काकडे, ज्ञानेश्वर बडवाईक, खुशाल कापसे,क्रिडा संचालक डॉ. सुधिर कहाते डॉ. काशिनाथ मानमोडे, डॉ., राकेश कभे,डॉ. ज्ञानेश शेंडे प्रा. प्रमोद गोरडे, प्रा. महेश चौंदे व शिक्षकेत्तर कर्मचा-याने तसेच स्थानिय नागरिका नी खेळाडुंचे अभिनंदन केले.