उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
चंद्रपूर : चंद्रपूर आर्म रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष हिमायूँ अली यांनी Gondwana University चे कुलगुरूंना निवेदन देऊन विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आर्म रेसलिंग या खेळाचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,आर्म रेसलिंगचा समावेश आधीच ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये करण्यात आला आहे.अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ आर्म रेसलिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ सत्रामध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.संबंधित कागदपत्रांची प्रत विद्यापीठ प्रशासनाला सादर करण्यात आली आहे.
हिमायूँ अली यांनी सांगितले की,आर्म रेसलिंग हा खेळ भारतासह परदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.गोंडवाना विद्यापीठाने हा खेळ सुरू केल्यास विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची आणि विद्यापीठासाठी पदके जिंकण्याची संधी मिळेल.भविष्यात विद्यापीठाने आर्म रेसलिंग स्पर्धेचे आयोजन केल्यास त्याची जबाबदारी चंद्रपूर आर्म रेसलिंग असोसिएशनला द्यावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.तसेच विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.
या मागणीबाबत विद्यापीठ प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन माहिती द्यावी,अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे।
निवेदन देतांना चंद्रपूर आर्म रेसलिंग असोसिएशनचे सचिव – अर्पण कोठारे, सदस्य – निलेश सातपुते, अश्विन खानके उपस्थित होते.



