खासदार नोकरी महोत्सवातून हजारो नोकऱ्यांचे उद्दिष्ट… — ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यंत….

प्रितम जनबंधु 

  संपादक 

 

भंडारा :- तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्याच्या उदात्त हेतूने 12 ऑक्टोबर रोजी भंडारा तर 13 ऑक्टोबर ला गोंदिया येथे खासदार नोकरी महोत्सव होवू घातले आहे. तत्पूर्वी भंडारा गोंदिया जिल्ह्यात सर्वच तालुका ठिकाणी नोकरी पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात जवळपास 6000 तरुण-तरुणींना नोकरी देण्याचा मानस खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे. 

           विविध 95 पेक्षा अधिक कंपन्यांना एकत्रित आणून जिल्ह्यातील तरुण-तरुणींना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळवून देण्याचे सकारात्मक दृष्टिकोण ठेवून 12 ऑक्टोबर रोजी भंडारा येथील स्प्रिंगडेल शाळेत तर 13 ऑक्टोबर ला गव्हर्मेट पॉलिटेक्निक कॉलेज, फुलचुर, गोंदिया येथे खासदार नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर कंपन्यांकडून महोत्सवात येणाऱ्या गरजू तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

           या महोत्सवात जवळपास 20 हजार युवक युवतींची नोंदणी झालेली असुन हि नोंदणी 22 हजार पर्यंत होणार अशी अपेक्षा खासदार सुनील मेंढे यांना आहे. या नोकरी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणी कुठेही कमी पडू नये यासाठी पुढाकार घेत खासदारांनी नोकरी पूर्व मार्गदर्शन शिबिरांचे यशस्वी आयोजन केले. या शिबिरात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, मुलाखती संदर्भात माहिती आणि अन्य आवश्यक गोष्टी सहभागींना दिल्या होत्या. सदर मार्गदर्शन शिबिर तरुणांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडले. खासदार नोकरी महोत्सवापूर्वी बेरोजगारांची पूर्ण तयारी करून घेतली गेली.

           या नोकरी महोत्सवात जिल्ह्यातील गरजू होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे आणि संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. 

          11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच कागदपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. बायोडाटा, मार्कशिट आधारकार्ड, फोटी असे 3 सेट तयार करुन सोबत घेऊन यावे. एका व्यक्तीस फक्त 3 ठिकाणी मुलाखत देता येईल. 3 पेक्षा अधीक ठिकाणी मुलाखत दिल्यास सर्व मुलाखती बाद करण्यात येतील अशाप्रकारच्या सुचनाही आयोजकांनी केल्या आहेत. अधिक माहितीसाठी 9860421201, 9175921201, 9561331201 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.