हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गिरवी च्या बालाजी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

 

निरा नरशिंहपुर दिनांक :11

प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार,

               भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गिरवी येथील बालाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे नूतन अध्यक्ष कल्याण व्यंकट क्षीरसागर व उपाध्यक्ष बाळासो पंढरीनाथ कोकाटे यांचा निवडीबद्दल शहाजीनगर येथे गुरुवारी सत्कार करण्यात आला.

         या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी गिरवी गावातील उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, दत्तात्रय शिर्के, प्रकाश मोहिते, संजय बोडके, रामलिंग जगताप, गणेश बेलपत्रे, महादेव क्षीरसागर, बापू क्षीरसागर, नवनाथ डिसले, शंकर ठोंबरे, निवृत्ती क्षीरसागर, चंद्रकांत क्षीरसागर, विजय क्षीरसागर, आजिनाथ कांबळे, पांडुरंग खंबे, हमु गवळी, किसन डिसले, हरिभाऊ डिसले, दत्तात्रय क्षीरसागर, विजय क्षीरसागर, विठ्ठल क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.