गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेश कुमार हे सचोटीबध्द अधिकारी:- डॉ.नामदेव खोब्रागडे यांचे प्रतिपादन

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

         रमेश कुमार हे नुकतेच गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक म्हणून रुजू झाले आहेत. रमेश कुमार साहेब हे अंत्यत दक्ष,व कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखले जाते.कुमार साहेब ज्या विगाचे प्रमुख होतात त्या विभागाचं संपूर्ण चित्र बदलून जाते अशी नागपूर विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.

         रमेश कुमार साहेब हे या पूर्वी आल्लापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक म्हणून अत्यंत प्रामाणिक,विश्वास, उत्स्फूर्त, दमदार, शिस्तप्रिय आणि संविधानिक कायद्याने प्रशासन चालवून या पूर्वीच आपल्या नावाचा व पदाचा दबदबा निर्माण केला अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे.

       रमेश कुमार साहेब यांचा जन्म महान क्रांतिकारक रामास्वामी पेरियार यांच्या तामिळनाडू या क्रांतिकारक भूमीत झाला.आणि तामिळनाडू या क्रांतिकारक भूमिला वंदन करून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू केली आणि भारतीय लोक सेवा आयोगाने घेतलेल्या IFS ची मानाची परिक्षा पास करून आपल्या बुद्धिमत्तेची व विद्वत्तेची झलक दाखवलि. 

       रमेश कुमार साहेब यांनी शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जन्म भूमीला आपली कर्मभूमी समजून उत्तमपणे प्रशासकीय कार्य करीत आहेत.

     कुमार साहेब यांची प्रशासकीय कायदा व प्रशासकीय कार्यावर जबरदस्त पकड असल्यामुळे भ्रष्टाचार व टेकेदारीत गुंतलेल्या वनकर्मचारी व वनअधिकारी आणि कर्तव्यकसूर करणाऱ्या वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकारी, आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांचे धाबे दणाणले आहे अशी लोकात जोरात चर्चा सुरू आहे.

      डॉ.नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष वाईस इंडिजीयस पिपल फार जस्टिस ॲन्ड पिस या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे यांच्या नेतृत्वाखाली नवरूजू वनसंरक्षक रमेश कुमार साहेब यांची भेट घेऊन वडसा वनविभागात वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने नष्ट होत असलेल्या राष्ट्रीय जंगल संपत्ती व चालू असलेल्या भ्रष्टाचाराची, आणि कायद्याचे पालन करणे व तत्कालीन वनसंरक्षक डॉ मानकर साहेब यांच्या आदेशाची वडसा उपवनसंरक्षक यांनी नेहमीच अवहेलना केली आहे.

       तसेच २००५ च्या बदली व दप्तर दिरंगाई कायद्याचे चिरीमिरी करण्यासाठी सर्रासपणे उल्लंघन करून भ्रष्टाचार करण्यासाठी वनअधिकारी यांना मार्ग मोकळा IFS ) उपवनसंरक्षक उपवनसंरक्षक सारख्या वनांच्या वरिष्ठ अधिकारीनी दिला आहे अशी लोकात खूप चर्चा सुरू झाली आहे. तसेच उपवनसंरक्षक यांच्या अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्या विरुद्ध इंडियन पीनल कोड मधील कलम १६६,१७५,१७६,१७७,१७९,१८८,२०४,३७९ आदि कलमाचा वापर करून त्यांच्या विरोधात आपण वनसंरक्षक या नात्याने FIR नोंदवावा.जर आपल्या कडून नोंदवत नसाल तर आम्ही नोंदवू अशी सविस्तर व मोकळ्या वातावरणात चर्चा झाली.आणि सन्मानिय रमेश कुमार साहेब यांच्या कडून भ्रष्ट, कामचुकार, वरिष्ठांच्या आदेशाची,व संविधानिक कायदे यांचे उल्लंघन करणाऱ्या उपवनसंरक्षक पासून सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक, आणि अधिकारी यांच्या वर कठोरात कठोर कारवाई करण्याची हमी शिष्टमंडळाला दिली.त्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे जिल्हा वासीयाच्या आशा प्रज्वलित झालेल्या आहेत.

  शिस्तप्रिय, सचोटीबध्द, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, तत्पर, शांतताप्रिय,अभ्यासू , आणि कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करणारे मा.रमेश कुमार साहेब वनसंरक्षक यांचा विविध संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आणि त्याना पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी रमेश चौधरी राज्य अध्यक्ष संविधान पर्यावरण व जंगल संरक्षण संघटना.