सामाजिक वनीकरण कडून होत असलेल्या वृक्ष लागवडीत जी.प.शाळेच्या विध्यार्थिनी केले वृक्षारोपण…

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही : समाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदेवाही कडून सिंदेवाही ते लाडबोरी मार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याबाबत नियोजन करण्यात आले.सदर वृक्ष लागवड करण्यासाठी समाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदेवाही कडून वृक्ष लागवड करण्यात येत आहे.वृक्ष चे महत्व काय आहे मुलांना कळावे या साठी वृक्ष लागवड करताना वृक्ष लागवडी बाबत समाजिक वनीकरण चे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री एम बी गायकवाड यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी मधील शिक्षक वृंद सह विध्यार्थ्यांना आमंत्रित करून वृक्ष लागवडीच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला, कार्यक्रमाला श्री.गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे पंचायत समिती सिंदेवाही व डॉ सुरपाम पशु वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने हजर होते, विध्यार्थ्यांना वृक्ष बाबत मार्गदर्शन करतांना पी.एम गायकवाड वृक्ष लागवडीच मानवी जीवनात काय महत्व आहे,या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले,या नंतर गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे यांनी प्रत्येक विध्यार्थ्यानी एक झाड लावून जोपासना करावी असा सुरेख संदेश दिला,यानंतर वृक्ष रोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन समाजिक वनीकरण परीक्षेत्र चे वनपाल श्री पी.एम .खोब्रागडे यांनी केले होते.या मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी चे शिक्षकवृंद श्री गुरुनुले सर, श्री रहगंडले सर, राजश्री वसाके मॅडम व ठाकरे मॅडम उपस्थित होत्या,याचं सोबत ग्राम पंचायत लाडबोरी मधील मंगेश दडमल उपसरपंच, कमलाकर कामडी,कमलाकर बोमनपल्लीवार, व वर्ग 1 ते 7 चे एकूण 92 विध्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते,विशेष म्हणजे पाऊस सुरु असताना देखील वर्ग 1 ली च्या विध्यार्थी व शिक्षकांनी वृक्षरोपण केले.