आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिऑड मध्ये नवजीवनच्या विद्यार्थ्यांचे यश…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

     साकोली:नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) जमनापुर/साकोली येथे ऑलिम्पिऑड पदकांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बक्षिस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती प्रशासकीस अधिकारी विनोद किरपान, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर व वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास उपस्थित होते.

       आंतरराष्ट्रीय सामाजिक शास्त्र ऑलिम्पिऑड परीक्षेत निधी येले, यथार्थ बोपचे, संस्कार बोरकर, तनिष्क भावे, निषीध गहाणे व स्वस्तिक व्यास या ६ विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन ६ सुवर्ण पदक मिळविले तर आंतरराष्ट्रीय विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र द्वितीय स्तर ऑलिम्पिऑड परिक्षेत स्माही पर्वते, यक्षित बोपचे व यथार्थ बोपचे यांनी अनुक्रमे क्षेत्रीय उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र मिळवून शाळेचे नाव लौकीकास आणले. या पदक व प्रमाणपत्रांचे वितरण प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य, प्रशासकीस अधिकारी, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, सतिश गोटेफोडे व समस्त शिक्षक वर्ग यांना दिले.

       कार्यक्रमाचे संचालन विशाखा पशिने तर आभार वैशाली राउत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन मधील शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे योगदान दिले.