भागीमहारी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे अर्तगत ग्रामसंघ महिला शेतकरी गटाची शेतकरी सभा घेऊन बियाने चे वाटप करण्यात आले.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी ::ग्राम पंचायत भागमहारी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे सन 2023 अंतर्गत ज्वारी, बाजरी, राक्ष, व राजगिरा बियाण्याची वाटप करण्यात आली. 

या निर्मिती शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम कार्यक्रम अंतर्गत भागेमहरी, येथे महिला शेतकरी गटाची शेतकरी सभा घेण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये कृषि सहायक श्री.ए.व्हि. ढोले यांनी आहारा मध्ये पौष्टीक तृणधान्यां चे महत्त्व सांगितले तसेच महीला बचतगटा तील शेतकरी महिलाना जवारी, बाजरी, राक्ष राजगिरा वियाण्याची वाटप करण्यात झाली. 

सदर महिला शेतकरी गटाची शेतकरी सभा किसान सभे ला भागीमहारी येथील सरपंच श्री. ज्ञानेश्वर महादेवराव राऊत, समूह संसाधन यक्ती (CRP) सौ. भारती सुभाष केळवदे , समुह संसाधन व्यक्तीचे वित्तीय साक्षरता प्रशिक्षक सौ. लता सिताराम भड, ग्रामसंघाच्या सचिव सौ. ज्योती प्रेम भोंडेकर ग्रामसंघा च्या अध्यक्ष पुष्पा देवराव गोमकाळे, कृषि मित्र श्री. ज्ञानेश्वर डोमाजी राऊत प्रामुख्याने उपस्थीत होते . कार्यक्रमा ला गावातील शेतकरी नागरिक व बचतगट महीला संघांचा महीला सभासद प्रामुख्याने हजर होते.