राष्ट्रीय समाज पक्षाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी किरण होले यांची नियुक्ती…

 

युवराज डोंगरे/खल्लार 

  उपसंपादक

      माजी कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षा चे संस्थापक महादेवराव जानकर यांच्या हस्ते पंढरपूर येथे सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे रुग्णसेवक किरण होले यांची अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

      विधानसभा,लोकसभा, जिल्हा परिषद , पंचायत समिती करिता राजकीय समाज पक्ष अमरावती जिल्ह्यामध्ये निवडणूक लढणार आहे .त्याकरिता जिल्ह्यात बांधणी करून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते पक्षात घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी राष्ट्रीय समाज पक्षाने सुरू केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी अमरावती जिल्ह्यासह अकोला ,खामगाव, बुलढाणा बाळापुर, येथे सुद्धा नवीन जिल्हाध्यक्ष यांच्या निवड करण्यात आली आहे . सर्व नियुक्ती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तोहशिफ शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या आहे.