आजाराला कंटाळून शिपायाची नाल्याच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या…

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

     आजाराला कंटाळून शाळेतील शिपायाने गावठी नाल्याच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

       दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील शाळेवर शिपाई म्हणून कार्यरत असलेले मनोहर पांडुरंग चव्हाण यांनी शेजारी गावठी नाल्यातील पाण्यामध्ये उडी घेऊन स्वतःचा जीव संपवला. गजानन मनोहर चव्हाण हे काही दिवसापासून आजारी होते.

      ते अकोला येथील डॉक्टर दिपक केळकर यांच्याकडे ते उपचार घेत होते. अशी माहीती समोर आली असून आजाराला कंटाळून शिपाई मनोहर चव्हान यांनी नाल्याच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. घटनेची माहिती रुग्णसेवक सचिन शेलारे यांना येवदा पोलीस स्टेशनला दिली. रुग्णवाहिका घेऊन सचिन शेलारे पोहोचले व त्यांचा पार्थिव उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उत्तरीय तपासणी करीता घेऊन आले शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले गजानन चव्हाण यांच्या मागे आई पत्नी दोन मुले असा परिवार असून ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याचे सांगितले पुढील तपास येवदा पोलीस स्टेशन करीत आहे.