आई आमची…..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

        वृत्त संपादीका

                मातृत्व व मातृत्वाची परिभाषा ज्याची त्यांनाच कळते.तद्वतच मातृत्वाची साथ अल्पकालीन असो की दीर्घकालीन असो,”आई ही आईच असते,आणि आईची ममता ही सखोल व काळजीपूर्वक संगोपनाची असते,”अशा पध्दतीचे बोलके व तितकेच हृदयस्पर्शी दृश्य,एका भटकणाऱ्या गाव प्राण्यांच्या जबाबदारीचे बघून मन हेलावून गेले.

             मातृत्व व त्या मातृत्वातंर्गत पालकत्वाची जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक घेतली जाते हे एका भटकणाऱ्या पाळीव कुत्री ने अधोरेखित केले.यामुळे शब्दशः अंतःकरण भारावून गेले होते.

                    उघड्यावर असलेली अनेक छोटे पिल्लू आपल्या आईची आतूरतेनी वाट बघत होते याची कल्पना त्यांच्या हालचाली वरुन आली होती.याचबरोबर आईच्या मातृत्व उबेंनी शांत व्हायचे आणि तिच्या कुशीत निवांत आराम करीत आईच्या मातृत्वाचा सुखद अनुभव घ्यायचा,असा प्रसंग त्या पिल्लांच्या बाबतीत बघताना अलगद मलाही माझे लहानपण आठवले आणि माझे आईबाबा स्मरण कल्पनेतून चक्क समोर आले.

         तेवढ्यात त्या पिल्लांची आई म्हणजे कुत्री आली आणि सर्व तिचे बाळ तिच्या जवळ गेले.ते सर्व पिल्लू आपल्या आईचा सहारा घेत निवांत झाले,शांत झाले.आपल्या आवश्यक प्रक्रिया करु लागले.

              त्या पिल्लांची आई सुद्धा शांत राहून आपल्या लहान पिल्लांना त्याच पद्धतीने सहारा देत होती,ममता पुर्वक गोंजारत होती,दुध पाजत होती व त्यांच्या सोबत बाळगत होती.

             सदर पाळीव प्राण्यांची जागरूक वैचारिक शक्ती बघून,त्यांची एकमेकांच्या प्रती असलेल्या ममतेची व प्रेमाची सखोलता कळली.

              सदर प्रसंग हा अनेक कल्पनेला वाव देणारा होता हे विसरता येणारे नाही.