बसपा सुप्रिमो बहन मायावतींच्या सभांचा झंझावात.. — मध्यप्रदेश,राजस्थान,तेलंगणा व छत्तीसगड राज्यात बसपाची स्थिती मजबूत.. — बसपाचा पराभव करण्यासाठी कांग्रेस व भाजपा एक होणार? — विधानसभा निवडणूक अंतर्गत मानसिक व वैचारिक गुलामी झिडगारून फेकण्याची मतदारांना उत्तम संधी..

 संपादकीय

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

             विधानसभा निवडणूक निमित्ताने बसपा सुप्रिमो बहन मायावतींच्या प्रचार सभा राजस्थान,मध्यप्रदेश,तेलंगणा व छत्तीसगड राज्यात होत आहेत आणि होणार आहेत.

             या चारही राज्यात बसपा सुप्रिमो बहन मायावतींच्या प्रत्येक सभांना मतदारांची होणारी प्रचंड गर्दी बघता देशातील नागरिक व मतदार त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी,”बहनजी कडे,खूप मोठ्या आशावादाने बघत असल्याचे दिसून आले आहे.

              याचबरोबर बसपाच आमचा सार्वभौमत्व विकास करु शकतोय आणि आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणीत आमच्यात बदल करु शकतो,आमची प्रगती करु शकतो,आमचे संरक्षण करु शकतो या विचाराने चारही राज्यातील बहुसंख्य मतदार प्रेरीत झाले आहेत.

***

भाजपा व काँग्रेस…

             मतदार हा जागरूक होत असल्यामुळे खोट्या आश्वासनातंर्गत भुलथापांना बळी पडणार नाही हे भाजपा व काँग्रेस पक्षाच्या लक्षात आले आहे.म्हणूनच विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा धर्मवाद व अंधश्रद्धावाद पुढे करतो आहे तर काँग्रेस जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा प्रामुख्याने रेटून धरतो आहे.

     पण…

         खालील मुद्द्यांत खरी स्पष्टता…

***

मान्यवर कांशीराम साहेब व बहुजन समाज आणि त्यांची जातीनिहाय जनगणना….

         मात्र,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात,बसपा संस्थापक मान्यवर कांशीराम साहेबांनींच सर्वप्रथम जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता व — “जितनी जिसकी संख्या भारी,उतनी उसकी भागिदारी,”– यासाठीच जातिनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे सांगितले होते व या संबंधाने भारतभर जन आंदोलन करुन देशातील नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली होती.

         तद्वतच मान्यवर कांशीरामजी यांनी धर्मवाद व अंधश्रद्धा वादावर भाष्य करीत देशातील नागरिकांना मानसिक व वैचारिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेकदा वैचारिक प्रहार केले आहेत.

           ज्या वेळेस मान्यवर कांशीराम साहेबांनी,”जातिनिहाय जनगणना करण्यासंबंधाने भारतभर नागरिक जागृतीचे कार्यक्रम लावले होते,त्यावेळी मनुवादी विचारसरणीचा प्रभाव असलेले कांग्रेस पक्ष व भाजपा पक्ष सुत्रधार मुंग गिळून गप्प बसलेले होते हे वास्तव आहे.

             देशात असलेली ब्राह्मणांची राजकीय,शासकीय व प्रशासनीक मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी भाजपा पक्ष व काँग्रेस पक्ष सुत्रधार जातिनिहाय जनगणना करून स्वतःच्या पायावर दगड मारुन घेणार नाहीत.आणि देशातील नागरिकांचा हक्कांबद्दल आक्रोश बघता जातिनिहाय जनगणना त्यांनी केली तरीही,”त्या जातीनिहाय जनगणने नुसार भारत देशातील बहुजन समाज घटकातील नागरिकांना लोकसंख्येच्या आधारावर त्यांचे हक्क देणार नाहीत एवढे पक्के आहे.तद्वतच भाजपा पक्ष व काँग्रेस पक्ष सुत्रधार जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला येनकेन प्रकारे बाजूला सारून गप्प बसतील असे स्पष्ट आहे.

***

म्हणूनच…

              म्हणूनच आजच्या स्थितीत मध्यप्रदेश,राजस्थान,तेलंगणा व छत्तीसगड विधानसभा निवडणूकीतंर्गत प्रचंड संघर्ष बघायला मिळत आहे.या चारही राज्यात बसपाच्या दमदार व प्रभावी प्रचार तंत्राने तेथील स्थानिक मतदार बसपाकडे वळू लागला असल्याचे चित्र आहे.

               चारही राज्यातंर्गत बसपाच्या प्रचार तंत्राने भाजपा व काँग्रेस पक्षाची राजकीय स्थिती अनेक विधानसभा मतदारसंघात डामाडौल केली असून त्यांच्या उमेदवारांची दमछाक केली आहे.

             विधानसभा निवडणूक रनधुमाळी अंतर्गत राजस्थान,मध्यप्रदेश,तेलंगणा व छत्तीसगड राज्यात बसपाचा वाढता प्रभाव भाजपा व काँग्रेस पक्षासाठी डोईजड होऊ लागले आहे व या दोन्ही पक्षांना सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी अडसर ठरू लागला आहे.

***

यामुळेच कुटिल कारस्थान..

           चारही राज्यातंर्गत अनेक विधानसभा मतदारसंघात बसपाचे उमेदवार प्रभावी ठरु लागले आहेत व विजयाच्या भक्कम स्थितीत आहेत.

          यामुळे बसपाच्या उमेदवारांना हरविण्याचे कुटिल कारस्थान भाजपा पक्ष व काँग्रेस पक्ष सुत्रधार गोपनीयपणे करु शकतात व दोन्ही पक्ष एक होऊन,”एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांना मदत करु शकतात, असे चिन्हे आता दिसू लागली आहेत.

***

द्वेषी मिडिया..

         मनुवादी म्हणजे ब्राह्मणवादी इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मीडिया या देशांतर्गत बहुजन समाज घटकातील नागरिकांच्या विरोधात प्रसंगावत सदासर्वदा काम करतो आहे.तद्वतच पक्षांची राजकीय स्थिती या मुद्याला अनुसरून,”आकलनाच्या नावावर, मतदारांना अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे भाजपा किंवा कांग्रेस पक्षालाच मतदान करा असे सांगतो आहे किंवा इतर मनुवादी विचार सरणीच्या पक्षांना सहकार्य करा असे सुचवितो आहे.

      (उदा:- विशेषतः सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले,शैक्षणिक क्रांतीच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज,देशातील तमाम नागरिकांचे तारणहार युगप्रवर्तक-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बहुजन समाजातील संतांच्या विचारसरणीला मानणाऱ्या बसपाचा,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनांचा सातत्याने विरोध करते आहे.)

         यामुळे मध्यप्रदेश,राजस्थान,तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील मतदारांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मीडियाच्या भुमिकांना आणि सर्वेक्षणाला महत्वहिन बनविले आहे व नाकारले आहे.

***

बसपा..

              बहुजन समाज पार्टी म्हणजे वास्तव्यातंर्गत वैचारिक शक्ती आहे व प्रभावी असे राजकीय आणि सामाजिक संघटन आहे.या पक्षाचे लचके(तुकडे) करण्यासाठी मनुवादी विचारसरणीचे मातब्बर व इतर स्वकीय नेहमी टपलेले असतात.

           याचबरोबर बसपाला कमजोर करण्यासाठी वेळ गमावत नसल्याचे सुध्दा अनेक घटनाक्रमावरुन पुढे आले आहे.

            मात्र,सामाजिक स्तरावर बसपाची वैचारिक मुळे खोल रुजली असल्यामुळे बसपाचे लचके करणे त्यांना अजूनही जमले नाही.

***

मतदारांना नामी संधी…

        सत्ता परिवर्तन करणे व सत्ताधाऱ्यांना अस्थिर आणि कमजोर करणे हे मतदारांच्या सकारात्मक विचारात दडलेले असते.

          सत्ताधाऱ्यांना कमजोर व अस्थिर केल्याशिवाय जनतेच्या म्हणजेच मतदारांच्या ज्वलंत आणि मुलभूत समस्यांकडे ते लक्ष देत नाहीत व मतदारांच्या हितसंबंधांचे कार्य करीत नाही,कर्तव्य पार पाडित नाही हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे.

           यामुळे मध्यप्रदेश,राजस्थान,तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील मतदारांना विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून नामी संधी चालून आली आहे की त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवणे,त्यांना कमजोर करणे…

            तद्वतच विधानसभा निवडणूक अंतर्गत मानसिक व वैचारिक गुलामी झिडगारून फेकण्याची मतदारांना उत्तम संधी आहे.