मानोरा गावकरीच करणार कर्नाटक एम्टा कंपनीची दिवाळी साजरी… — संतप्त गावकऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती…

     उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती

       कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीला लागून असलेले मानोरा गाव पुनर्वसना पासून वंचित असून येथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार नाही. नेहमीच कंपनीच्या अधिकारीवर्गाला निवेदन देऊन सुद्धा ते या गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच गावात बोलवून फराळ ,पाणी देऊन फटाके फोडून दिवाळी साजरे करू.हा कार्यक्रम दि. १० नोव्हेंबरला साजरा करणार असल्याचे मानोरा ग्रामपंचायत सदस्य गिरजा पानघाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

         कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणी करिता मानोरा गावकऱ्यांना विश्वासात घेऊन काही जमिनी संपादित केल्या. २००५ पासून या कंपनीचे कोळसा उत्पादनाचे काम सुरू आहे मात्र या गावाचे अजून पावेतो पुनर्वसन झाले नाही.प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकी झाल्या त्याचा मोबदला दिला जात नाही, गावातील बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही, घरांना ब्लास्टिंग मुळे भेगा गेल्याने घरे राहणे योग्य नाही या सर्व मागण्यासाठी मानोरा गावकरी गेल्या कित्येक दिवसापासून कंपनीच्या कार्यालयात,जिल्हाअधिकारी यांना निवेदन दिले मात्र या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याने २००५ पासून या गावात दिवाळी पाहिजे तशी साजरी करण्यात आली नाही.

       त्यामुळे या दिवाळीला गावातच कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून दिवाळी साजरी करणार असल्याचे आमंत्रण दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गिरजाबाई पानघाटे, सरिता गेडाम, निराशा राऊत, भीमा कुमरे सह इतर गावकरी उपस्थित होते.

          राजू डोंगे उपसरपंच बरांज – मानोरा – गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रास्त आहे पुनर्वासाच्या मागण्यासह इतर मुद्द्यावर जिल्हाअधिकारी कार्यालयात अनेक बैठका झाल्या,घरांची मोजणी झाली.मात्र गावातील काही नागरिकांनी घराचे अनुदाना संदर्भात आक्षेप घेतल्याने पुनर्वसन प्रक्रिया थांबली आहे.