शैला गावडे (जांभळकर) यांना शिक्षक साहित्यिक सन्मान प्रदान…

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

 पुणे : मराठी अध्यापक संघ,पुणे शहर यांच्या वतीने यावर्षीचा शिक्षक साहित्य सन्मान खेड तालुक्यातील धानोरे जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेतील उपशिक्षिका शैला गावडे (जांभळकर) यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुण्यातील सावित्रीबाई फुले सभागृहात कसबा विधान सभेचे आमदार रविंद्र धंगेकर, सकाळचे उपसंपादक विनोदी कथा लेखक सु.ल.खुटवड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी मराठी अध्यापक संघाचे पुणे जिल्हा तसेच शहर अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. 

          पुणे जिल्हातील विविध तालुक्यातील साहित्यिक शिक्षकांना तसेच पुणे शहरातील गुणवंत शिक्षकांना याप्रसंगी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या मेधा सिन्ररकर, मराठी संघाच्या अध्यक्षा कल्पना शेरे, मराठी अध्यापक संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.अनेक जेष्ठ साहित्यिक याप्रसंगी उपस्थित होते.