पावसामुळे घराची पडझड,कुटुंब आले रस्त्यावर.. — पीडितांना शासनाकडून मदतीची अपेक्षा..

 

अरमान बारसागडे

तालुका प्रतिनिधी चिमूर

दखल न्यूज भारत

 चिमूर:-

          तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या तडाक्यात मौजा खुटाळा (मो.) येथील घराची पडझड झाली आहे. त्यामुळे सदर कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे.

            मौजा खुटाळा (मो.) येथील दुर्योधन डहारे यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले व आज दिनांक १० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराची मुख्य भिंत कोसळली,सुदैवाने कुटुंबावरील जीवितहानी टळली. 

              डहारे कुटूंबियात एकूण सात सदस्य आहेत,मोलमजुरी करून त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह सुरू आहे.दरवर्षी त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असते.

         अशातच मुसळधार झालेल्या पावसामुळे त्यांच्या घराची मुख्य भिंत कोसळली व त्यांचा संसार उघड्यावर आला.

             कुटुंब अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे.त्यांचे नाव घरकुलाच्या प्रपत्र ‘ ड ‘ मध्ये असूनसुद्धा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल मंजूर होत नाही आहे.

           प्रशासनाच्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही व डहारे कुटूंबियांची कसलीही विचारपुस केली नाही असे डहारे कुटुंबाचे म्हणणे आहे. 

           शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन आम्हाला त्वरित मदत करावी अशी मागणी पीडित दुर्योधन डहारे यांनी केली आहे.