समर्थ महाविद्यालय येथे चंद्रयान-3 वर निबंध स्पर्धेचे आयोजन…

चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

           राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोज शनिवारला समर्थ महाविद्यालय लाखनी येथे भूगोल विभागातर्फे चंद्रयान -3 या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

          या स्पर्धेच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, संस्था सदस्य शिवलाल रहांगडाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य देवाजी पडोळे व मधुकर हेडाऊ, समर्थ स्टडी केंद्र प्रमुख डॉ धनंजय गभने, प्रा अजिंक्य भांडारकर, प्रा मनीषा मदनकर, प्रा डॉ अर्चना मोहोड, प्रा डॉ स्मिता गजभिये, प्रा रुपाली खेडीकर, प्रा राखी बावनकुळे, प्रा मोहन फुंडे, प्रशांत वाघाये आणि श्यामराव पंचवटे प्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

              महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कापसे यांनी चंद्रयान -3 मोहिमेवर थोडक्यात मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा योग्य निबंध लेखन असेल अशा विद्यार्थ्याची महाविद्यालयाच्या अर्चना वार्शिकांकात दखल घेण्यात येईल असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उध्दबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन भूगोल विषयाच्या विभाग प्रमुख प्रा स्वाती सिंगनजुडे व आभार प्रा मनीषा मदनकर यांनी मानले.