भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज रुग्णांची भरगच्च गर्दी… — आय ड्रापचा तुटवडा… — चंद्रपूर जिल्हा परिषद सिईओ आय ड्रापची समस्या दूर करतील काय?

 

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

          चंद्रपूर जिल्हा अंतर्गत अप्पर तालुक्याचे ठिकाण असलेल्या भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज रुग्णांची भरगच्च संख्या पाहून एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण भिसीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात काय?यावर क्षणभर स्तब्ध व्हावे लागले.

           मात्र,भरगच्च रुग्णांना सेवा देतांना येथील डॉक्टर कष्टी मॅडम,स्टाफ नर्स,नर्स व इतर स्टाफ दक्ष दिसलाय.तद्वतच या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टाफची कमतरता असल्याचे दिसून आले.

         सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत चिचूली,जामगाव,पुयारदंड,आंबेनेरी,येरखेडा,हे सब रुग्ण केंद्रे असून जवळपास ४० हजारांच्या घरात अनेक प्रकारचे आजारग्रस्त रुग्ण उपचारासाठी सदर केंद्रात येत असल्याचे पुढे आले आहे.

            याचबरोबर या आरोग्य केंद्रात आय ड्राप उपलब्ध नसल्याचे उघड झाले.डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांना भिसी आरोग्य केंद्रातून आय ड्राप मिळत नसल्याने सदर रुग्णांची दयनिय अवस्था झाली आहे.

        भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात आय ड्राप उपलब्ध नसल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे भिसी आरोग्य केंद्रात आय ड्रापची व्यवस्था त्वरित करतील काय? हा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.