आळंदीत राज्यस्तरीय स्वानंद वकृत्व स्पर्धेचे १७ सप्टेंबर रोजी आयोजन….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्रीमहंत पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त स्वानंद करंडक २०२३ राज्यस्तरीय स्वानंद वकृत्व स्पर्धेचे प्रथमच आयोजन रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे असे आयोजक प्रभुराज महाराज पाटील यांनी सांगितले.

            वकृत्व स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकावर येणाऱ्या स्पर्धकास ७ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ३ हजार व चतुर्थ १ हजार तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी विषय १) पसायदान – वैष्विक शांततेची प्राथना, २) संतांचे सामाजिक योगदान, ३) चला माणूस बांधूयात…, ४) महाराष्ट्राच्या जडणघडणीत महीला संतांचे योगदान, ५) भारताची अवकाश गवसणी रे असणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १६ सप्टेंबर पर्यंत आपली नावे श्री अमृतनाथ स्वामी महाराज संस्था,आळंदी येथे नोंदवावी. वकृत्व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व संपर्क साधण्यासाठी प्रभुराज महाराज पाटील 9130053006, हरिष दिघीकर 9029605177, संतोष गव्हाणे 9850191896 यांच्या संपर्क साधावा. जास्तीत जास्त युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आयोजक प्रभुराज महाराज पाटील यांनी केले आहे.