पालासावली ग्रामपंचायत च्या परसोडी पेठ येथे सभामंडप भवन व नाली बांधकामाचे भुमिपुजन संपन्न.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी परशिवनी

पारशिवनी :-पारशिवनी तालुक्यातील गट ग्राम पंचायत पालासावली अंतर्गत परसोडी पेठ येथे जिल्हा परिषद बाधकाम विभागाचे 2515 योजने अंतर्गत समाजभवन व नाली बांधकामच्या 15 लाख रुपये लागत चे व ग्राम विविध विकास योजना च्या कामांचे भूमिपूजन आमदार आशिष जी जयस्वाल रामटेक विधानसभा यांच्या हस्ते सरपंच राजेन्द ठाकुर यांचे अध्यक्षेत सायं 5.oo वाजता भूमिपुजन कार्यक्रम घेण्यात आले.

             या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍडव्होकेट आशिष बाबू जयस्वाल साहेब, गट ग्राम पंचायत पालासावळीचे सरपंच राजेंद्र ठाकूर ,उपसरपंच पार्वताबाई उकेपैठे, ग्राम पंचायत सदस्य गोलू भाऊ तूरणकर ,सागर राऊत,माया बागमरे, सामाजिक कार्यकर्ता रामकृष्णा चकबैस,विजय इंगळे ,ताराचंद राऊत ,मोरेश्वर दरवाई ,प्रभाकर सहारे ,व इतर गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते .