हजेरी मारुती मंदिर सभामंडपाच्या दगडी कामाचा शुभारंभ… — रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांच्या हस्ते शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र आळंदी येथील ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या दगडी कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी या मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण होवो आणि या ठिकाणी हनुमान जन्मोत्सावात मोठ्या प्रमाणात रामकथेचे आयोजन करण्यात येईल तसेच या मंदिराच्या कामासाठी सर्वांना सढळ हाताने मदत करावी असे आवाहन ढोक महाराज यांनी दिले.

        यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, आदित्य घुंडरे, चेअरमन पांडुरंग वरखडे, जनार्दन पांढरे, रामदास कुऱ्हाडे, संतोष भोसले, सुनील रानवडे, विशाल वहीले, नितिन साळुंके, रमेश जाधव, कृष्णा मांजरे, मंगेश आरु, सुधाकर महाराज काटोल, राजेंद्र गोरे, राजेश वहीले व आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.