गडचिरोलीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या… — आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात…

प्रितम जनबंधु

संपादक 

          गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सुवर्णा गजानन गज्जलवार (वय 27, रा. फुले वॉर्ड, गडचिरोली) असे मृतक महिलेचे नाव आहे.

       प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्णा तालुक्यातील चक बल्लारपूर येथील रहिवासी सुवर्णा गज्जलवार ही महिला विवाहित असून, तिला एक मुलगा आहे. ती आपल्या पतीला सोडून गडचिरोली येथील फुले वॉर्डात सुधाकर कांबळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. दरम्यान शुक्रवारला रात्रीच्या सुमारास महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजते.

        ही घटना शनिवारी उघडकीस येताच वॉर्डात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. बातमी लिहेस्तोवर महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. सदर प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.