गौरव सावळे यांना आचार्य पदवी बहाल…

 

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक

          अहिल्याबाई सायन्स अँड इंजिनिअरिगचे विद्यापीठ इंदौर तर्फे नुकतीच गौरव जिवन सावळे यांना आचार्य पदवी बहाल करण्यात आली. गौरव सावळे मागील १३ वर्षापासून प्रा.राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती येथे प्राध्यापक म्हणून सेवा देत आहे. त्यांचे संशोधनाचा विषय मशीन लर्निग अंतर्गत होता. त्याचा संशोधनाचा टॉपिक ऑटोमेटेड फ्रेमवर्क फॉर्म स्टॉक मार्केट प्रेडिकेशन युझिंग सेंटिमेंट अँन्यालीसिस अँड मशीन लर्निग अप्रोच हा होता. या संशोधन करिता त्यांना प्रो.डॉ. मनोज के. रावत हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. 

         त्यांचे संशोधनात त्यांना डॉ.ए.एस.अल्वी आणि सीनियर सहकारी प्रोफेसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.

          गौरव सावळे आपल्या या यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक डॉ.मनोज के रावत सोबतच आई ज्योती सावळे, वडील जीवन अमृतराव सावळे, पत्नी युग्मिनी गौरव सावळे, प्रो.प्रवीण नेरकर, डॉ.रुचिता काळे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्यांनी या संशोधना साठी सहकार्य केले त्या मित्रमंडळींना देतात.

             त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे परिसरातील मित्र प्रा.सतीश खोडे, रवींद्र चवरे, गौतम गजभिये, संदीप अंबाडकर, सूरज मंडे, प्रशांत भगेवार, रवि मेश्राम, दिलीप ईखार, संजय इंगोले, संजय पेटले, रवी कडू, हर्षल कड, मिलिंद चिरडे, सुनील सावळे, नितीन गुल्हाणें, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी अगदी अल्प वयात मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.