छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे इंडक्शन कार्यक्रम चे उदघाटन…

युवराज डोंगरे/खल्लार

  उपसंपादक

           छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रमोद गारोडे, भगवंतराव पाटील महाविद्यालय परतवाडा हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी सौरभ गुडदे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे उपस्थित होते.

           कार्यक्रम यूजीसीच्या निर्देशाप्रमाणे महावितरण विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व विभागाची योग्य माहिती व्हावी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रमोद गारोळे यांनी विद्यार्थ्यांना सीबीसीएस पॅटर्न विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा, याविषयी मार्गदर्शन केले.

        विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. भारत कल्याणकर व आभार प्रदर्शन डॉ. प्रविण सदार यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. रवींद्र इचे डॉ. आशिष काळे डॉ हरीश काळे तसेच बीए भाग एक चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.