धानोरा येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न….  

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

        दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोज गुरुवारला जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न झाली.सदर स्पर्धेकरिता तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविला सदर स्पर्धेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा येथील चमुने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील चमुने पटकावला.

         या स्पर्धेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत साळवे प्रभारी मुख्याध्यापक उद्धाटक म्हणून सुधीर आखाडे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमुख अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, सहारे सर साधन व्यक्ती,श्रीमती प्रेमिला दुगा मँडम श्रीमती शर्मीष्ठा धाईत मॅडम,श्रीमती वालकर मॅडम, मोहन देवकते सर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक पालवदे सर,महेंद्र कुकूडकर सर, निशिकांत शामकुळे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर रत्नागिरी सर यांनी केले आभार प्रदर्शन मोहन देवकते सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शालेय कर्मचारी वर्गांनी सहकार्य केले.