कॅम्पस प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा… — समर्थ महाविद्यालय येथे कॅम्पस प्लेसमेंट…

 

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी

       राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आज दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोज शनिवारला समर्थ महाविद्यालय लाखनी येथील भगिनी निवेदिता सभागृहात कॅम्पस प्लेसमेंट झाले त्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, संस्था सदस्य शिवलाल रहांगडाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य देवाजी पडोळे व मधुकर हेडाऊ, समर्थ स्टडी केंद्र प्रमुख डॉ धनंजय गभने, प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत वाघाये आणि श्यामराव पंचवटे प्रामुख्याने उपस्थित होते. 

        2 सप्टेंबर 2023 रोजी इव्होनिथ व्हॅल्यू स्टील लिमिटेड, वर्धा या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. यात 60 विद्यार्थ्यांनी लेखी पेपर आणि मुलाखतीत सहभाग घेतला होता. यात कु पूर्वा लांडगे, शैलेश हटवार, हिमांकुश क्षीरसागर, मार्शल हजारे, गणेश मस्के , सौरभ निर्वाण असे 6 विद्यार्थी यांची निवड ऑफिसर ट्रेनी म्हणून करण्यात आली. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रुजू प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजामध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. सदर विद्यार्थी 11 सप्टेंबरला वर्धा येथे रुजू होणार आहेत त्यानिमित्ताने आज त्यांचा अभिनंदन सोहळा पार पडला.

         या कार्यक्रमाला दिल्ली येथून आलेले पत्रकार प्रशांत वाघाये यांनी मुलाखतीचे मंत्र आणि तंत्र याविषयावर सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कापसे यांनी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच कॅम्पस इंटरव्ह्यू झाले आणि त्यात 6 विद्यार्थी निवडले गेले. आता दरवर्षी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना नोकरी कशी मिळवून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू आणि आज 6 विद्यार्थी लागले आता पुढे 60 विद्यार्थी कसे लागतील यासाठी प्रयत्न करू असे ते यावेळी बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध मार्ग उपलब्ध करून देत आहोत, आता विद्यार्थ्यांनी तशी तयारी करणे आवश्यक आहे. जे 6 विद्यार्थी एवोनिथ स्टील येथे रुजू होणार आहेत तेथे त्यांचे भवितव्य चांगले आहेत. त्यामुळे आता बाकी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे आणि सामोरे जावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. जयश्री निर्वाण व आभार प्रा मेघा धांडे यांनी मानले.