प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी च्या वतीने गप्पी मासे सोडणे मोहीम संपन्न..

 नागपूर विभागीय प्रतिनिधी: ऋग्वेद येवले

       साकोली:प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडीच्या वतीने गावामध्ये डासांची पैदास थांबविण्यासाठी व किटकजन्य आजाराचे उद्रेक थांबविण्यासाठी गप्पी मासे सोडण्याचे धडक मोहीम दिनांक ९/९/२०२३ ला राबविण्यात आली. गावातील तीन विहिरीमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. व परिसरातील परसटोला , बोरगाव येथे सुद्धा गप्पी मासे सोडण्यात आले.

   एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तीन विहिरीमध्ये गप्पी मासे सोडतांना आरोग्य सहाय्यक एन. के.घाटबांधे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवक आर.सी .बोरकर यांनी विहिरीमध्ये गप्पी मासे सोडले.

       सदर मोहीम मध्ये ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कोतवाल दिलीप शहारे उपस्थित होते.