शांतता व सुव्यवस्था राखून व शासकीय नियमांचे पालन करून सण उत्सव साजरे करा. :- साहिल झरकर पोलीस उपविभागीय अधिकारी…

 

ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी – आगामी येणारे गणेशोत्सव, पोळा व ईद-ए-मिलाद हे सण उत्सव नागरिकांनी – शासकीय नियमांचे पालन करून आनंदात व उत्साहात साजरे करावे असे आवाहन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी केले.

         आगामी काळात येणारे सण , उत्सवात तालुक्यातील गावात व शहरात शांतता अबाधीत राहावी. तसेच समाज बांधवांमध्ये जातीय तेढ निर्माण न करता एकजुटीने सण उत्सव साजरे करण्यात यावे. यासाठी ०८ सप्टेंबर रोजी आरमोरी पोलिस ठाण्याच्या वतीने, पोलिस ठाण्याच्या प्रांगणात शांतता कमिटीची सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी साहिल झरकर बोलत होते.

        कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक,नगराध्यक्ष पवन नारनवरे, वीजवितरण कंपनीचे इंजिनियर उपस्थित होते.

          शांतता एकोपा आणि सामंजस्य राखून उत्सव शांततेत पार पाडून आरमोरी शहराचा नावलौकिक करावा असेही आवाहन साहिल झरकर यांनी केले.

            सदर बैठकीला माजी जि. प. सदस्या मनीषा दोनाडकर, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, काँग्रेसच्या महिला जिल्हा महासचिव रोशनी बैस, आरमोरी न. प. चे आरोग्य सभापती भारत बावनथडे, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, हेमलता वाघाडे, पत्रकार रुपेश गजपुरे, महेंद्र रामटेके, प्रवीण रहाटे, दौलत धोटे, ऋषी सहारे,रुपेश बारापात्रे, तालुका होमगार्ड समादेशक अनिल सोमनकार, आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर, किशोर सहारे व नागरीक उपस्थित होते.