नागपूर विभागीय प्रतिनिधी: ऋग्वेद येवले
साकोली:नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे श्री कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वन्दना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षक भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व सतिश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनात राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा व रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून सौ. शर्मिला कछ्वाह, सौ. पायल टेम्बुर्णे , सौ. प्रिंशू उंदीरवाडे, सौ. सोनी डोंगरे आणि सौ. प्रियंका भेंडारकर उपस्थित होत्या. स्पर्धेची सुरुवात श्रीकृष्णच्या प्रतिमेचे पुजन माल्यार्पण व जयघोषांनी करण्यात आली.
वेशभूषा स्पर्धेमध्ये नर्सरी ते ५ च्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. सांस्कृतीक कार्यक्रम सुरू असतांनी ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’, कृष्ण मुरारी, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, च्या जयघोषाणांनी संपुर्ण नवजीवन परीसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन सीबीएसईचे सांस्कृतीक प्रमुख सरताज सारारे. वैशाली राउत व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहूमोलाचे सहकार्य केले.