ब्रेकींग न्युज… घडा येथिल कापसाच्या गंजीला आग,5 क्विंटल कापूस जळून खाक, शेतीपयोगी साहित्यासह वाहनाचेही नुकसान,सुदैवाने जिवीतहानी नाही…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

          लगतच्या घडा येथील शेतकरी प्रशांत विनायक हरणे यांच्या घरात ठेवलेल्या कापसाच्या गंजीला अचानक आग लागून या आगीत 200 क्विंटल कापसापैकी 5 क्विंटल कापसासह ताडपत्र्या, ड्रम, स्प्रिंकलर, पेरणीयंत्र, सायकल व इतर शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले असून यात दुचाकी व चारचाकी वाहनाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

           यात दोन ते तीन लाख रुपयांचे प्रशांत हरणे यांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.सुदैवाने मात्र जिवीतहानी झाली नाही.