संताजी नगर कांद्री वॉर्डात बंद घरातून ५० हजार रुपयांचा माल चोरीला गेला,पोलिसात गुन्हा दाखल…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

कन्हान : चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील संताजी नगर वॉर्डात गुरुवार 6 जून रोजी रात्री ही घटना घडली, सौ. प्रीती ज्ञानेश्वर माहुलें या आपल्या पती आणि आपली मुलीसोबत राहतात. ती घरी काम करून आपला उदरनिर्वाह करते आणि तिचा पती ज्ञानेश्वर हा कारखान्यात काम करतो.

          ६ जून रोजी रात्री ते घरचे सर्वजण नागपुरात आपल्या मामाच्या मुलाच्या घरी गेले. कार्यक्रम संपवून ते ७ जून रोजी सायंकाळी घरी पोहोचले. तेव्हा त्यांना घरा च्या समोरच्या गेटला कुलूप दिसले. मात्र घरातील हॉल रूमचे कुलूप तुटले होते. जे आत खुर्चीवर ठेवलेले दिसले. किचन स्वमपांक खोली मध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम नव्हती. यामध्ये अंगठी, मंगळसूत्र, ४५ हजार रुपये किमतीचे सोने व ५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. 

         कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. श्वान आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र अद्याप पर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि पोलिस निरिक्षक उमेश पाटील यांनीही घरचा आढावा घेतला, उन्हाळ्यात शहर व गावात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पुढील तपास पो उप नि सह पो हवा पोलिस स्टेशन कन्हान हे पुढील तपास करित अज्ञात आरोपी चा शोध घेत आहे सुरू आहे.